शहरापासून दूर एक कालेज... रात्रीची वेळ...लोडशेडिंग सुरु ...असलेल मुलींचा घोलका भुतांच्या गोष्टी करत बसलेल... अगदी रंगून जावून एक जण गोष्ट सांगतेय, " आणि रात्री त्या तीन पैकी एक जण जागा होतो। आणि त्याच्या अंगात ते घरामधले भूत शिरते। तो एकदम सरळ होतो आणि त्याचे डोळे लाल लाल दिसायला लागतात। तेवढ्यात उरलेल्या दोघंपैकी एकला जाग येते तो पाहतो की त्याचा मित्र त्याच्याकडेच पाहतो आहे ... पण त्याचे डोळे लाल लाल ...त्याच्या छातीऐवजि त्याची पाठ आहे त्याच्याकडे॥ आणि ......" तेवढ्यात आवाज होतो " ...फटाक" आणि सगळ्या मुलींवर पानी पडत॰ सगळ्या जोरात ओरडतात... किंचा्ळतात. लगेच होस्टेल मध्ये आरडा-ओरडा ....... गोंधळ ...कुठुनतरी कोणी सीनियर ओरडते " अग काय झाले ?? कशाचा हा गोंधळ ??" तिकडून वार्डेन येतोय " ये कयाची गड़बड़ लावली आहे ??" वोचमन धापा टाकत येतोय ॥ " काय झाले??" आणि तेवढ्यात वीज येते॥ सगळे होस्टेल मग चौकशी सुरु करते................ आणि एक तासानी तीच मुलगी पुन्हा सगळ्या होस्टेलाला तीच गोष्ट सांगत असते....
इति होस्टेल मधली भूताची रात्र संपूर्णंम ....!!!!
not sooooooooo....bad.keep it up.
ReplyDelete