काय करू सुचतच नाहीये टायटल मग टाकले असेच, पण असे टायटल असेल की एक बरे असते काहीही लिहिता येत, उगीच एक लिहितांना येणारा दूसरा विचार दाबुन पहिला पुढे दामटावा लागत नाही, कसे???
हा तर मी ना संक्रांति वर एक पोस्ट लिहिणार होते, म्हणजे लिहिली पण होती, मग कंटाळा आला तर ते राहिलाच बाजूला... असो
हे असो वैगरे लिहिले की काय ग्रेट वाटते नाही, एकदम प्रौढ़ भाषा... काल मी 'स्लीपलेस इन सीटल' हा मूवी वाचत होते, खरच मी हा पिक्चर विकिपीडिया वर वाचत होते, मग हा जुन्या काळातला इंग्रजी पिक्चर पूर्ण स्टोरी सह तिथे वाचला, आवडला म्हणजे कथा साधीच आहे पण त्याची बांधणी आवडली, मग जाणवले की अरेच्चा आपला ''कुछ कुछ होता है' पण जरा त्याच्यासारखाच आहे की, म्हणजे पोरांनी आपल्या आई-बापाचे लफड़े करून द्यायचा प्रकार हो अजुन काय... पण बॉस आपल्याला त्याचे काय म्हणजे मला, मी तर ही सगळी माहिती फक्त त्यातील गाण्यासाठी, गाणी पण आवडली मला, ते स्टारडस्ट, वेन आय फोल इन लव, द वे ऑफ लाईफ... मस्त गाणी आहेत...
बघायला पण पाहिजे पिक्चर, स्टोरी मी इथे लिहिणार नाही, विकिमाता आहेच त्यासाठी... तोवर जरा अजुन गाणी शोधायला पाहिजेत....
Saturday, January 22, 2011
भूताची गोष्ट
मला ना लहानपणापासुनच साहसाची अदभूत गोष्टींची फार फार आवड होती, अगदी मर मर मरायचो आम्ही त्या गोष्टी ऐकन्यासाठी, कोणीही पाहुणा आला घरी की त्याची भरपूर दिवसभर खातिरदारी करायची आणि मग रात्रि त्याला गोष्टीची गळ घालायची, तो जर चांगला असेल तर एखाद्या वाघाच्या नि राजकुमारीच्या गोष्टी नंतर भूताची पण सांगायचा... पण जर का तो खडूस निघाला तर दुसर्या दिवशी त्याच्या कड़े आम्ही अगदी पहायचो पण नाही, हळु हळु कोणाला गोष्टी येतात नी कोणाला नाही याचा पण आम्हाला अंदाज यायला लागला नी आमची मेहनत सफल होवू लागली...
गावाला गेले की मग तर या गोष्टीची रेलचेल असायची, एक तर गावातील वातावरण ती रात्रीची नीरव शांतता, गोठ्याचा मिश्र वास, झाडांची सळसळ, दुरून दिसणारे एस टी चे दिवे, मंदिरातल्या गुरवाची रात्रीची हाळी आणि सोबतीला २०-२५ सगळ्या वयोगटातील पोरांचा जत्था... गोष्ट सांगायला एखादी बारावीतली ताई किंवा दादा, क्वचित आजी किंवा घरी आलेला पाहुणा आजोबा....
अहाहा काय दिवस होते ते, तेव्हा त्या गोष्टी ऐकताना वाटणारी हुरहुर, भीती, उत्सुकता त्या दाबलेल्या किन्काळया, भूत पळून गेल्यावर किंवा बोतल मध्ये पकडल्यावर किंवा मेल्यावर (हो तेव्हा आमची भूत मरायची हा ...) ते हुश्श हश्श तल्या ... तो आनंद बहुतेक गोष्टी च हीरो किंवा हिरोइन जो असाच कोणीतरी राम्या, विजय, कमला एखादी बुदी माय किंवा खुपच मोडर्न झाले तर इंग्रजी नाव जुली वैगरे....
ही जी इंग्रजी भूता असायची ती ना नेहमी त्यांच्या स्मशानातुन यायची, त्यांच्या क्रोस ला घाबरायाची, आपल्या सारखी हनुमान किंवा रामाचे नाव घेतात तशी जीजस च्या नावाला घाबरायाची नाहीत, नेहमी चर्च च्या बाहेर वाट बघत असायची, आणि खुप घाण दिसायची, त्यांचे कपडे नेहमी रक्ताने भरलेले असायचे ( आपल्या भूतांसारखे पांढरे नसायचे कपडे), आणि त्यांचा एखादा पाय किंवा हात गोष्टी मध्ये तुटायाचा ते तसेच लंगड़ात किंवा दुसर्या चांगल्या हातानी मारायचे.... बापरे त्यांच्या त्या किळसवान्या अवताराचीच आम्हाला भीती वाटायची त्यापेक्षा आपली भूत बरी असाच आमचा नेहमीचा होरा होता...
तर ही आपली भूत (तेव्हा भूतानापन जाती ची बंधने होती हा) मानुस असेल तर रस्त्याच्या कडेला, पुलाखाली, बांधावर, एखाद्या डोंगरकपारीवर रत्रिचाच९-१० वाजता असायचा आणि भूत बाई असली तर ती नदी-तलाव-विहिरीच्या काठावर, चिंचा-बोरी यांच्या झाडावर, मंदिराच्या बाहेर पहाटे ३ वाजता भेटायच्या... त्यात मानुस भूत अगदी नार्मल वाटायचा पण त्याला पाय नसायचे तर बाई भूत पांढरी साड़ी, लाम्ब काळे केस उलटे पाय अशी असायची... आणि या सगळ्याना दीड मन भात, , मिरे, आणि गुळाचा नैव्येद्य लागायचा सोडून जायला, जर भूत याने एकला नाही तर छु-छा मान्त्रिक यायचा... हा मान्त्रिक फार तेजस्वी असायचा आम्ही कधीच त्याच्याकडे डोळे उघडून बघू शकलो नसतो लगेच आंधळे झाले असतो (इथे आम्ही गोष्ट ऐकताना खरच डोळे बारीक़ करायचो... ही ही ही), आणि मग तो खुप नाचून धूर करायचा नी धुरात भूताची आकृति दिसायची मग त्याला पकडायचा, त्यांची मारामारी होत असे पण आम्ही काहीच पाहू शकत नव्हतो कारण एक तर आंधळे होण्याची भीती आणि दुसरे म्ह्णणजे धूर (मी खुपदा लहानपणी हा प्रसंग बंद डोळ्यानी पहिला आहे, ) असा सरसरून काटा यायचा ना ... मग तो भूत पकडला जायचा नी त्याला मग त्याची गति मिळायाची (ह्या गतिचा अर्थ मला अत्तापण कळत नाही)...
मग त्या बाबाला खुप अन्न द्यायचे वैगरे नंतरचे सोपस्कार पण तो पर्यन्त आम्ही थांबयाचोच नाही लगेच आमचा जल्लोष सुरु जणू काय ते भूत आम्हालाच पीडत होते...
कसली मज्जा होती लहानपणी, मला आज जाणवतय की बहुतेक ती मज्जा पुन्हा कधीच मला येणार नाही, तो भाबडा विश्वास, ती भीती, तो सरसरून येणारा काटा, ती बंद डोळयांपुढली मारामारी, तो सुटका झाल्याचा आनंद, जणू काही खरच जगातून एक भूत नाहीसे केले...
आता मी त्यात तर्कशुद्ध पणे चूका काढीन, त्यातल्या तेजस्वी मांत्रिकाला बहुतेक डोळे उघडे ठेवुनही पाहू शकणार नाही, दीढ़ मण भाताचे हे समीकरणही लागु होणार नाही... आता फक्त एवढेच म्हणता येइल "रम्य ते बालपण रम्य त्या आठवणी"...

Subscribe to:
Comments (Atom)