Monday, November 1, 2010

सुट्टी...

मुंबई ...!!!
परत एकदा मुंबई.... कित्ती कित्ती दिवसानी छान ८-१० सुट्ट्या घेउन गावाला गेले होते दादाचे लग्न होते, काय धम्माल मज्जा केलीये म्हणून सांगू ... अक्षरशः धुमाकुळ घातलय आम्ही सगाळयानी लग्नात ... खरी मज्जा तर तेव्हा आली जेव्हा, मारुती वरून मांडवात परत आलेल्या नवर्या मुलाला (आमचा दादा) नवरीच्या भावंडानी (मुख्यतः वहिनीची बहिन सदरातील मुली ) दारावर अडवले आणि प्रवेश फी मागितली ... यावर दादाची पहिली प्रतिक्रिया होती "हे पण बरेआहे म्हणायचे, हमालालाच पैसे मागताहेत" (जाडी आहे आमची वहिनी जरा )... आणि त्या डब्ब्यांना दादाची ही कोटि कळलीच नाही... मग काय आम्ही पण जोर केला नी सरळ त्यांचे कड़े तोडून दादाला आत पोहचवला... बसले पाहत सगळे, हा त्याची कसर त्यानी जोड्यांच्या पैस्यात भागवायची ठरवली होती पण तिथेही आमच्या दादाने गुगली टाकला, "अरे ठेवून घ्या तो जोड़ा, २५०चाच आहे, सासर्यनेच दिलाय मी नवीन घेणारच होतो....(ही ही ही हा हा हु हु खो खो खा खा खी खी इती आम्ही)...

पण तिथे गेल्यावर जाणवले, घरापासून दूर इथे मुंबई मधे राहून मी खरच काय मिस करतेय ते, तिथे सगळ्याना सगाळयांच्या भानगडी, सध्याच्या उलाढाली माहित आहेत, सगळे कसे एकमेकाना धरून आहेत, ती मस्ती तो खोडकरपना, तो गोंधळ, ती चिडावा-चिडवी, तो खोटा राग, ते मनसोक्त हादड़ने (वजन वाढणे म्हणजे काय? तेच मुळी तिथे कोणाला ठावुक नाही) हिड़ने - फिरणे, नदीत डुंबने, मोठ्यांचा शब्दा-शब्दातुन जाणवणारा जिव्हाळा, तिथले ते दिलखुलास वातावरण.... खरच पैसे कमवायच्या नादात, मोठे होण्याच्या नादात मी काय मागे सोडून आलेय ??????????