कस झालय न सगळ, तीन ठिकाणी तिघी- म्हणजे मीच तीन... वेगवेगळी
एक ग्रुप ऑफिस मधला , स्वताला hi-fi समजणारा इतरांच्या क्षमतेपलिकदाचा आणि माझ्या सीमारेषा अजुनच गुंता-गुंतिच्या करणारा ...
एक ग्रुप half-half, म्हणजे ऑफिस मधलाच पण कायम त्याच्या (ऑफिस च्या) परिघाबाहेराचा... एकदम मस्तीखोर, भटकणारा अगदी साधा सरळ मार्गी , माझ्यासारखाच गडांवर भटकनारा , मनात न ठेवता तोंडावर खरे काय ते बडबडणारा ग्रुप ....
आणि तीसरा ग्रुप.... हा जरा complicated आहे ... म्हणजे मी, एक मैत्रीण आणि एक मित्र बस एवादाच...
मैत्रीण: ही मला कॉलेज च्या शेवटच्या वर्षी भेटलेली आणि मग नकळतच अगदी खासम खास झालेली.... सगळे आनंद, अवघ्या जगावरचा राग movie रेविएव, ड्रेस मटेरिअल che वादंग, चीन चा भूकंप आणि आसाम मधला पुर , federer चे wimbeldon, सचिन देवाचा उडालेला त्रिफळा , लहान बहिणीचे admission सगळे काही हक्कानी बोलायाचे ठिकान .... सध्या लग्न जुळलय तिचं , त्यातही प्रॉब्लम येताहेत (तिला) निस्त्तरतेय बिचारी aani मी...मस्तपैकी 'मानसिक' का काय तो आधार देतेय , म्हणजे बाकि उधर की 'family' प्रकारात आपणही किती हस्तक्षेप करणार....
मित्र: इथेच मुम्बैत भेटलेला (हो मुम्बैत ) , आणि तेहि आता १-१ १/२ वर्षानी.... खरच किती बर वाटल होतं म्हंटल चला आता पुन्हा एकटेपना येणार नहीं, पण कशाचे काय.... तो मेला involve व्हायला लागला नी याच मैत्रिणी कडून त्याला झापला , आता तिने नेमके काय सांगितले देवच जाने पण तो एकदम तुटुनच गेलाय म्हणजे केली मी धडपड ....त्याने पण पुन्हा जोडायची पण ..... नाहीच जमल even आताही जमात नाहिया...
भीती वाटते... पुन्हा एकटेपण तर येणार नहीं... कसा व्ह्यायाचे या वेळी, जमेल का पुन्हा सगल्या जगाकडे पाठ फिरवून जगायला.....