आज जाम बोअर होतय अस वाटतं पळून जावं झालं आपल्या गावाला... काय ही मुंबई आणि काय इथली लोक अगदी नकोसं झालय.... नको ही नौकरी आणि नको स्वतंत्रपणा...
जीव अगदी मेटाकुटिला आलाय बघाहुश्श.... अस वाटतय छान गावाला घरी जाव... अंगणात झोपाळयावर बसून गरम चहा प्यावा, भाजलेले चने खावेत किंवा वाटान्याच्या शेंगा खाव्यात.... रात्री मनसोक्त भाकरी आणि ठेचा खावा.... रजईत गुरगुटून झोपावं..... पण आता नकोत ती स्वप्न मोठ्ठ झाल्याची किंवा चकाचक ऑफिस मध्ये टकाटक हिलचे शूज वाजवत हातात फाइल घेउन चालायची...
आता वाटत स्वप्न यावीत ती शांत सकालची जिथे अलार्म नाही लोकालची वेळ गाठायची घाई नाही.... डब्बा विसरला तर कॅन्टीनच्या जेवणाची आधीच येणारी शिसारी नाही... स्वप्न यावीत ती आरामात वाचत चहा घेण्याची... जिथे रविवार म्हणजे घरच्यांसोबत घालवलेला आनंदी दिवस.... ना की पुढच्या आठावडयाच्या धावपळीची तयारी...
अस का??????